विमान कंपन्यांची तिकिट दरांची मनमानी थांबणार ? सरकारने दिला महत्वाचा आदेश

इंडिगो एअरलाइनच्या मोठ्या विमानसेवा विस्कळीततेमुळे देशभरात निर्माण झालेल्या गोंधळादरम्यान, केंद्र सरकारने आज ६ नोव्हेंबर मोठा निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी आणि भरमसाठ तिकीट दरांची गंभीर दखल घेत, परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत भाड्यावर कठोर मर्यादा घालण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.

इंडिगो एअरलाइनच्या मोठ्या विमानसेवा विस्कळीततेमुळे देशभरात निर्माण झालेल्या गोंधळादरम्यान, केंद्र सरकारने आज ६ नोव्हेंबर मोठा निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी आणि भरमसाठ तिकीट दरांची गंभीर दखल घेत, परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत भाड्यावर कठोर मर्यादा घालण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे की, सध्याच्या गोंधळात काही विमान कंपन्यांकडून आकारले जाणारे अवाजवी दर मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहेत.

अवाजवी तिकिट दरांवर नियंत्रण येणार ?

मंत्रालय म्हणाले, “प्रवाशांचे कोणत्याही स्वरूपाच्या ‘संधीसाधू किंमत’ धोरणापासून संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने आपल्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे, जेणेकरून सर्व प्रभावित मार्गांवर वाजवी आणि योग्य भाडे आकारले जाईल.” या निर्देशाचा मुख्य उद्देश बाजारातील किमतीचे शिस्तपालन राखणे, संकटात असलेल्या प्रवाशांचे शोषण थांबवणे आणि ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्ण अशा नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याची खात्री करणे आहे. सर्व विमान कंपन्यांना निर्धारित केलेल्या ‘भाडे मर्यादां’चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत या भाडे मर्यादा लागू राहतील.

मुंबई-पुणे विमानप्रवास तिकिट लाखाच्या घरात

इंडिगो एअरलाईन्सच्या संचलनाचा गोंधळ सुरूच आहे. विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय कायम असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. विमान सेवा विस्कळीत झाल्यानंतर इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक मोठी वाढ केली आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी विमानाच्या तिकिटाचे दर गगनाला भिडल्याचं दिसत आहे.

इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News