MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Independence day quiz 2025: देशभरात स्वांतत्र्यदिनाचा उत्साह; 15 ऑगस्ट विशेष ज्ञानात भर टाकणारी प्रश्नमंजुषा सोडवा!

Written by:Rohit Shinde
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता आपण खास प्रश्नमंजुषा सोडवू, आणि त्याची उत्तरे जाणून घेऊ...
Independence day quiz 2025: देशभरात स्वांतत्र्यदिनाचा उत्साह; 15 ऑगस्ट विशेष ज्ञानात भर टाकणारी प्रश्नमंजुषा सोडवा!

भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९४७ साली याच दिवशी भारताला ब्रिटिशांच्या साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात व देशाला उद्देशून भाषण देतात. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो, देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत, नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली जाते. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची किंमत समजावतो आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची प्रेरणा देतो. १५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे.

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा

  1. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले?
  2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
  3. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणाचे नाव काय?
  4. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग कोणते आहेत?
  5. अशोक चक्रात किती आरे आहेत?
  6. पहिल्या स्वातंत्र्य संग्रामास कोणते वर्ष ओळखले जाते?
  7. “भारताचे लौहपुरुष” म्हणून कोण ओळखले जातात?
  8. “वंदे मातरम्” गीताचे लेखक कोण?
  9. भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू झाले?
  10. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करतात?
  11. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
  12. “जन गण मन” राष्ट्रगीताचे रचनाकार कोण?
  13. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
  14. ‘भारत सोडो’ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
  15. “जय जवान, जय किसान” हे घोषवाक्य कोणी दिले?

वरील प्रश्नमंजुषेची उत्तरे

  1. १९४७
  2. पंडित जवाहरलाल नेहरू
  3. ट्रिस्ट विथ डेस्टिनी (Tryst with Destiny)
  4. केशरी, पांढरा, हिरवा
  5. २४ आरे
  6. १८५७
  7. सरदार वल्लभभाई पटेल
  8. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
  9. २६ जानेवारी १९५०
  10. भारताचे पंतप्रधान
  11. लॉर्ड माउंटबॅटन
  12. रवींद्रनाथ ठाकूर
  13. १९३१
  14. १९४२
  15. लाल बहादुर शास्त्री