पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध प्रचंड विकोपाला गेले असून, येत्या काही काळात युद्ध सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. युद्ध जर वास्तवात आलं तर भारतापुढे पाकिस्तानी सैन्याचा टिकाव लागणं अवघड असल्याचं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतायेत.
भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्याचा विचार केल्यास भारतीय सैन्य हे पाकिस्तानी सैन्यापेक्षा तिप्पट संख्येनं आहे. युद्ध झाल्यास 40 दिवस दारुगोळा डागण्याइतपत भारताची क्षमता आहे. दारुगोळ्याचा विचार केल्यास यातील 88 टक्के दारुगोळा स्वदेशी असून, या दारुगोळ्याची निर्मिती भारतात झालेली आहे.

भारताचं संरक्षण क्षेत्राचं बजेट हे पाकिस्तानच्या संरक्षण क्षेत्राच्या बजेटपेक्षा दसपट जास्त आहे. भारताचं संरक्षण बजेट हे 64. 295 लाख कोटी इतकं आहे तर पाकिस्तानचं संरक्षण बजेट हे 6.3 लाख कोटी इतकं आहे.
हवाई दल- भारताकडे राफेल आणि सुखोईसारखे फ्लायटर जेट
पाकिस्तानी हवाईदलाच्या तुलनेत भारताचं हवाईदल प्रचंड मजबूत स्थितीत आहे. राफेल आणि सुखोईसारख्या फायटर जेट्ससमोर पाकिस्तानची एफ-16 सारखे जेट्स हे कमकुवत असल्याचं सांगण्यात येतं. भारताजवळ हेरॉन, हरोप आणि हर्मीस सारखे इस्रायली ड्रोन आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून 450 किमी ते 1000 किमी अंतरापर्यंत मारा करता येणं शक्य होणार आहे.
भारताकडे अमेरिकी एमक्यू-9बी रीपर सारखे मोठे आणि कताकदवान ड्रोन आहेत, आयएनएस विक्रांतवरुन समुद्यातून या ड्रोनद्वारे हल्ला करता येणं शक्य आहे.
भारतीय सैन्यदल – रात्रीही लढण्याची क्षमता
भारताकडे टी-90 भीष्म आणि अर्जुन सारखे ताकदवान रणगाडे आहेत. स्वयंचलित रणगाड्यांचपाकिस्तानची आघाडी असली तरी एका जागेवरुन दुसऱ्या जागी तोफा नेण्याच्या पातळीवर भारत आघाडीवर आहे. पाकिस्तानपेक्षा 1.6 पट तोफा भारताकडे जास्त आहेत. रात्रीच्या वेळएस युद्ध करु शकणारी अपग्रेडेड हत्यारं भारतीय सैन्याकडे आहेत.
जवानांची संख्या
1. सक्रिय जवान
भारत- 14.55 लाख
पाकिस्तान- 6.54 लाख
2. राखीव जवान
भारत- 11.55 लाख
पाकिस्तान 0 5.5 लाख
3. पॅरामिलिट्री जवान
भार- 25.27 लाख
पाकिस्तान – 5 लाख
4. रणगाडे
भारत- 4201
पाकिस्तान- 2627
5. आर्टिलरी
भारत- 4075
पाकिस्तान- 3291
नौदल- भारताची मजबूत समुद्री ताकद
भारताजवळ आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य सारख्या विमानवाहक युद्धनौका आहेत. तर पाकिस्तानजवळ अशी कुठलीही विमानवाहक युद्धनौका नाहीये.
भारत आणि पाकिस्तानात मोठा लमुद्री तट आहे. या युद्धनौकातून फायटर जेट्स पाकिस्तानवर डागणं शक्य आहे. यासह भारताकडे आण्विक पाणबुड्या आहेत. अशा पाणबुड्या पाककडे नाहीत.
अण्वस्त्रातही भारताचं पारडं जड
भारताकडे 180 परमाणू हत्यारं आहेत. तर पाकिस्तानकडे 170 परणाणू हत्यारं आहेत. वेळ पडल्यास आण्विक अस्त्र पृथ्वी किंवा अग्नी शृंखलेतील क्षेपणास्त्रांतून डागण्याची भारताची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रांचा पल्ला 700 ते 8000 किमी इतका मोठा आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाटासारख्या आण्विक पाणबुड्यांतून के-15 सागरिका आणि के-4 क्षेपणास्त्र भारत डागू शकतो. तसंच मिराज-2000 आणि जग्वार सारखी जाहजंही आण्विक क्षेपणास्त्र डागू शकणार आहेत.











