India-Pakistan War! अतिरेकी हल्ल्याचे उत्तर युद्ध नव्हे, लोकांना वेठीस कशाला? ऑपरेशन सेंदूरवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडून आले. मग त्यांनी बिहारमध्ये कँम्पेन केले. केरळात गेले. मुंबईत वेवज परिषदेला आले. मग हे एवढी करण्याची आवश्यकता काय होती. असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत केंद्र सरकार आणि मोदींवर राज ठाकरेंनी टीका केली आहे.

Raj thackeray – भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ला केला आहे. या हवाई आल्यात पाकव्याप्त कश्मीरमधील तसेच पीओकेमधील ९ अतिरेक्यांची तळं उध्वस्त करण्यात आली. तर 26 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या ऑपरेशननंतर केंद्र सरकार आणि लष्कराच्या तिन्ही दलाचे कौतुक होत असताना, राज ठाकरेंनी या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आणि हल्ल्याचे उत्तर युद्धाने होत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटले.

लोकांना वेठीस धरणे चुकीचे…

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आहे, त्यांना शोधून मारले पाहिजे. त्यासाठी कोंम्बिग ऑपरेशन केले पाहिजे. याचा अर्थ युद्ध करणे असा होत नाही. ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते कुठे लपले असतील, ते त्यांना शोधून त्यांचा खात्मा केला पाहिजे…. त्यांना मारले पाहिजे. दुसरीकडे युद्ध करण्यासाठी जे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे…. सायरन वाजणार असं सरकार म्हणत आहे. हे सर्व करण्याची आवश्यकता काय आहे. जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. आधीच भारत देशात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. पण त्याच्यात आता युद्ध कशाला? असं राज ठाकरेंनी म्हटले आहे.

तेव्हा अमेरिकेने युद्ध केलं नाही…

दुसरीकडे जेव्हा लादेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेच्या व्हॉईट हाऊसवर हल्ला केला होता. तेव्हा अमेरिकेने युद्ध पुकारले नव्हते. किंवा कुठल्याही देशावर हल्ला केला नव्हता. तर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधू-शोधून मारले होते, हे एक उदाहरण आहे. त्यामुळे भारतानेही कुठेतरी अंतर्मुख होऊन, याचा विचार केला पाहिजे. आणि या हल्याचे उत्तर देणे म्हणजे युद्ध असा होत नाही. तर अतिरेक्यांना शोधून आपण मारले पाहिजे. असं म्हणत राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरचे कुठेतरी समर्थन केले नसल्याचे दिसून आले आहे.

पाकिस्तान आधीच बरबाद…

पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. त्याला काय बरबाद करणार तुम्ही? ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी तुम्हाला अजून सापडले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात. इतके वर्ष जातात. तिथे सिक्युरिटी का नव्हती? हे पाहिले पाहिजे, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. आपल्या देशात कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या अतिरेक्यांना शोधून काढणे महत्त्वाच आहे. युद्ध हा त्याचा पर्याय नाही. युद्ध हे उत्तर नाही. आज नाक्या नाक्यावर ड्रग्स मिळत आहेत. हे ड्रग्स येतात कुठून? यावर लक्ष देणे गरजेचे आहे. लहान लहान मुले, शाळेतील मुलं यांच्यापर्यंत ड्रग्स पोहोचतो कुठून? यावर लक्ष देणे गरजेचे आहे. असं राज ठाकरे म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News