नवी दिल्ली – पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये एयर डिफेन्स सिस्टिममुळे भारतीय सीमा आणि सीमेवरील अनेक राज्य सुरक्षित राहिली. त्यामुळं आता एयर डिफेम्स सिस्टिम अधिक मजबूत करण्यात येते आहे. भारतीय सैन्याच्या भारत इलेक्ट्रॉनिस्कस लिमिटेड म्हणजेच बेलनं ३० हजार कोटी रुपयांची अनंत शस्त्र एयर मिसाईल वेपन सिसिट्म खरेदीसाठी टेंडर जारी केलं आहे. सरफेस टू एयर असलेली ही डिफेन्स वेपन सिस्टिम डीआरडीओनं तयार केली आहे.
पहिल्यांदा या एयर डिफेन्स वेपन सिस्टिमला क्विक रिएक्शन सरफेस टू एयर मिसाईल म्हटलं जात असे. आता त्याचं नाव बदलून अनंत शस्त्र असं नाव देण्यात आलं आहे. अनंत शस्त्रच्या 5 ते 6 रेजिमेंट खरेदी करण्यात येणार आहेत. पाकिस्तानी आणि चिनी सीमेवर ही एयर डिफेन्स सिस्टिम तैनात करण्यात येणार आहे.

अनंत शस्त्र वेपन सिस्टिमची काय वैशिष्ट्ये?
1. शत्रू राष्ट्राच्या चालत्या फिरत्या शस्त्रांना टार्गेट करण्याची क्षमता अनंत शस्त्रमध्ये आहे.
2. अत्यंत कमी वेळात म्हमजे काही क्षणात अनंत शस्त्र वेपन डिफेन्स सिस्टिम उत्तर देऊ शकेल.
3. अनंत क्षस्त्रची मारक क्षमता जमिनीवरुन हवेत 30 किमी इतकी आहे..
4. सध्या भारतीय सैन्याकडे असलेल्या आकाशतीर आणि मीडियम रेंज सरफेस टू एयर मिसाईल सिस्टिमला अनंत शस्त्रची साथ मिळणार आहे.
5. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी अनंतशस्त्रची चाचणी करण्यात आलेली आहे.
6. ऑपरेशन सिंदूरमध्ये एयर डिफेन्स सिस्टिमं महत्त्व लक्षात आल्यानंतप या प्रकल्पासाठी हिरवा कंदिल देण्यात आला.
7. शत्रूराष्ट्रांनी केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा, ड्रोन हल्ले आणि मिसाईल हल्ला रोखण्यात अनंतशस्त्रचा मोठा उपयोग होणार आहे.
सैन्यदलात आता स्वदेशी शस्त्र
भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं की, येणाऱ्या काळात स्वजदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आता सैन्यदलाकडे असतील. त्यात नवे रडार, शॉर्ट रेंज एयर वेपन, जामर आणि लेझरवर आधारित एन्टी ड्रोन सिस्टिम यांचा समावेश असेल. भारतीय सैन्यदल आता स्वदेशी हत्यारांवर जास्त भरवसा ठेवते आहे.











