हिमाचल प्रदेशात पावसाळ्यात दरड कोसळण्याची घटना वारंवार घडते. यामुळे रस्ते, घरे आणि पिकं मोठ्या प्रमाणात हानी पोहचतात. अनेक वेळा लोकांचा जीवही धोक्यात येतो. अशीच एक धक्कादायक अपघाताची घटना समोर येत आहे. बिलासपूर जिल्ह्यातील झंडूता विधानसभा क्षेत्रातील बरठी परिसरात सायंकाळी भूस्खलन झालं. त्यानंतर झालेल्या भीषण अपघातामध्ये बसवर मोठी दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
बसवर दरड कोसळली; 18 मृत्यूमुखी
बिलासपुर मधील भल्लू पुलाजवळ एका बसवर अचानक दरड कोसळली. या बसमध्ये तब्बल 30 प्रवासी प्रवास करत होते. ही घटना घडतात स्थानिक नागरिकांनी, प्रशासनाने आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचाव कार्य सुरू केलं. जखमींना घुमारवी आणि झेंडूता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी देखील आहेत. यावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी या कठीण काळामध्ये कुटुंबीयांच्या सोबत असल्याचे सांगितलं तसेच प्रशासनाला बचाव कार्यात अधिक गती आणण्याचे निर्देश दिले असून जखमींना त्वरित उपचार आणि वैद्यकीय सोयींची पूर्ण व्यवस्था करण्याचे ही आदेश दिले आहेत.
बिलासपुर ज़िला के झंडूता विधानसभा क्षेत्र के बालूघाट (भल्लू पुल) के पास हुए भीषण भूस्खलन की ख़बर ने मन को भीतर तक झकझोर दिया है।
इस भारी भूस्खलन में एक प्राइवेट बस के चपेट में आने से 10 लोगों के निधन का दु:खद समाचार मिला है और कई अन्य के मलबे में दबे होने की आशंका है। रेस्क्यू… pic.twitter.com/GBZslb36CP— Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) October 7, 2025
दरड कोसळण्याच्या घटना चिंताजनक
हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात विशेषत: चिंताजनक ठरतात. या भागातील भौगोलिक स्थिती आणि सतत होणाऱ्या पावसामुळे माती सैल होते आणि डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर धोका निर्माण होतो. दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद होतात, वाहतूक अडथळा निर्माण होतो, घरे आणि शेतीचे पिकं नुकसान होतात, तर अनेक वेळा लोकांचा जीवही जातो. प्रशासनाने सतत भूस्खलनासाठी पूर्वसूचना, अलर्ट, रेस्क्यू ऑपरेशन आणि बचाव उपाययोजना यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांनीही सावधगिरी बाळगून सुरक्षित ठिकाणी राहावे, ही काळाची गरज आहे.











