श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भयंकर स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 32 जखमी, धक्कादायक कारण समोर

Rohit Shinde

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये काल (14 नोव्हेंबर) भयावह स्फोट झाला. यात नऊ जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर 92 आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलिस गोळा करत असताना हा स्फोट झाला. संपूर्ण 360 किलो स्फोटके पोलिस स्टेशनमध्ये साठवून ठेवण्यात आली होती की फक्त काही भाग आणण्यात आला होता हे स्पष्ट नाही.

दहशतवादी हल्ला नाही; पण, दिल्ली स्फोटाशी कनेक्शन

जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशन या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा जप्त करण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटा झाला आहेदिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्युलचं तपास या ठिकाणी सुरू होताफॉरेन्सिक टीम या स्फोटकांचे नमुने घेत होतीमात्र त्याचवेळी हा स्फोटा झाला आहेहा स्फोटइतका भीषण होता कीपरिसरामधील घरांचे दरवाजे खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेतहा साठा दिल्ली स्फोटातील आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आला होता.

दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट झाला.या स्फोटने आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या होत्याविशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेलीया घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होतीया घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असूनअनेक जण जखंमी झाल्याची माहिती समोर आली.

अधिकाऱ्यांनी घटनेबाबत दिली चक्रावून टाकणारी माहिती

अधिकाऱ्यांच्या मते, व्हाईट कॉलर टेररिस्ट मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलिस गोळा करत असताना हा स्फोट झाला. डीजीपींनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला नव्हता तर एक चूक किंवा अपघात होता ज्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. डीजीपींनी सांगितले की, पोलिस पीडितांच्या कुटुंबांसोबत उभे आहेत. डीजीपींनी सांगितले की, फरिदाबादमधून जप्त केलेली स्फोटके सुरक्षितपणे वाहतूक करण्यात आली आणि पीएसएच्या खुल्या जागेत साठवण्यात आली.  प्रक्रियेनुसार, ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार होती.

हरियाणातील फरीदाबाद येथे अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिल गनईच्या भाड्याच्या घरातून हे स्फोटक जप्त करण्यात आले होते. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता. आता त्याच जप्त केलेल्या साहित्याचा वापर करून झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या स्फोटाचीही चौकशी सुरू आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे जवळच्या इमारतींचे नुकसान झाले आणि लोकांचे तुकडे झाले.

ताज्या बातम्या