राज्यातील पावसाळी अधिवेशनाचा धुरळा बसतो न बसतो तोवर केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. दिल्लीत आज याचसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सकाळी ११ वाजता एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालेल. नेमके या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेला येतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
21 जुलैपासून केंद्राचे पावसाळी अधिवेशन
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .
२१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सकाळी ११ वाजता एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर आणि मतदार यादी पुनरावलोकन यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या संभाव्य संघर्षातून मार्ग काढण्यासाठी सरकार आज विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे चर्चेत?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. पर्यटकांना ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानला दणका दिला होता. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने निवडक देशांमध्ये राजकीय शिष्टमंडळे पाठवून देशाची दहशतवाद विरोधी भूमिका जाहीररित्या मांडली होती. शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील अनेक नेते सहभागी करुन घेतले होते. या सर्वच शिष्टमंडळांनी भारताची बाजू प्रभावीरित्या जगापुढे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच गाजू शकतो.
एक देश एक निवडणूक, मतदारांचे पुनरावलोकन, जातनिहाय जणगणना, जणगणना हे आणि असे अनेक मुद्दे या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.





