Navjot Kaur Sidhu Suspended : नवजोत कौर सिद्धू यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 500 कोटींचे विधान भोवलं

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय नसल्याने आणि पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत  काँग्रेसमधून नवज्योत कौर सिद्धू यांचे निलंबन करण्यात आलं

Navjot Kaur Sidhu Suspended :  पंजाबमधील काँग्रेसमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणामुळे पंजाब काँग्रेस मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत.

पक्षविरोधी कारवाईचा ठपका

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय नसल्याने आणि पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत  काँग्रेसमधून नवज्योत कौर सिद्धू यांचे निलंबन करण्यात आलं. या कारवाईनंतर नवजत कौर सिद्धू नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे आता पाहायला हवं.

काय होतं सिद्धू यांचे विधान (Navjot Kaur Sidhu Suspended)

पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आणि तिकीट देण्यासाठी कोट्यवधि रुपयांची डील केली जाते. काँग्रेसने अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तरच त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू सक्रिय राजकारणात परततील. परंतु त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यांनी आरोप केला की, जो कोणी ५०० कोटी रुपये असलेली सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. यावेळी त्यांनी असेही म्हंटल कि, त्यांना कोणीही पैसे मागितले नाहीत, परंतु सर्व व्यवस्था अशा प्रकारे काम करते. नवज्योत कौर सिद्धू पुढे म्हणाल्या, पंजाब काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, काँग्रेस पक्षातील किमान ५ नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. हेच नेते सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करू इच्छित नाहीत. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबतबद्दल बोलतो, परंतु मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News