अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या हंसलपूरच्या ई विटारा गाड्यांना परदेशात निर्यात करण्यासाठी हिरवा झेंडा दर्शवला. ही मारुतीची पहिली इलेक्ट्रिक गाडी आहे. ही गाडी संपूर्ण स्वदेशी बनावटीची असून या कारची निर्यात 100 देशांत करण्यात येणार आहे. या देशांत युरोपातील देश आणि जपानचा समावेश आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेमुळे मेक इन इंडियाच्या पर्वात नवा अध्याय योजला गेल्याचं म्हटलंय. आता परदेशात चालणाऱ्या ईव्हींवरही मेड इन इंडिया असं लिहिलेलं असं असं पंतप्रधान म्हणालेत.
पंतप्रधानांच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे
1. गणेशोत्सवाच्या उत्साहात आज भारतात मेक इन इंडियाचा नवा अध्याय घडतो आहे. भारताकडे मेमोग्रॉफिक अडव्हान्टेज आहे. भारताकडे शिक्षित मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याशी भागिदारी करणाऱ्यांना याचा फायदा होतोय.
2. जपानची सुझुकी कंपनी भारतात या गाड्यांची निर्मिती करते आहे. या गाड्या निर्मितीनंतर पुन्हा जपानमध्ये जाणार आहेत. याअर्थी मारुती सुझुकी कंपनी मेक इन इंडियाची ब्रँड अम्बेसेडर ठरलेली आहे.
3. यासाठी कितीही पैसे लागले तरी त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मात्र यातून जी निर्मिती होते आहे की आपल्या देशवासियांनी केलेल्या घामातून होते आहे. या कारच्या निर्मितीनंतर निर्माण होणारा गंध हा भारताच्या मातीचा असणार आहे.
4. आज जग भारताकडे आशेनं बघतंय, अशा स्थितीत कोणतंही राज्य मागे राहायला नको. प्रत्येक राज्याला संधीचा लाभ घेता आला पाहिजे. हिंदुस्तानात येणाऱ्या गुंतवणूकदारांना कोणत्या राज्यात जावं, असा प्रश्न पडायला हवा.
5. सगळ्या राज्यांनी यात सहभागी व्हावं, रिफॉर्म करण्याची स्पर्धा करावी. चांगल्या विकासाच्या धोरणांचची आणि चांगल्या प्रशासनाची स्पर्धा व्हावी, गर्वानं स्वदेशीकडे देशानं वाटचाल करावी. 2047 पर्यंत विकसीत भारताचं स्वप्न पूर्ण करु त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे.
20 लाखांपासून ईव्ही कारची किंमत
मारुती ई विचारा 49 किलो व्हॅटच्या बॅटरीवर चालणाऱ्या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 20 लाख रुपये असेल. तर जास्त क्षमतेच्या कारची किंमत 25 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. यासह ऑल व्हील ड्राईव्ह व्हर्जनची किंमत 30 लाखांपर्यंत असेल.





