Gold Silver Price Fall: सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण का ? नेमकी कारणे काय ? जाणून घ्या!

मौल्यवान धातू सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये दिवाळीनंतर मोठी घसरण झाली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये दररोज घट होत आहे. यामागे नेमकी कारणे काय, ते जाणून घेऊ...

ऐतिहासिक वाढीनंतर मौल्यवान धातू सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये दिवाळीनंतर मोठी घसरण झाली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये दररोज घट होत आहे. आज 30 ऑक्टोबर रोजी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today) 1,10,600/- तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,20,640/- रूपये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,520/- रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीची किंमत देशातील बहुंताश प्रमुख शहरात 1,51,000/- रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे दरामध्ये आता अलीकडच्या काही दिवसांमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. याबाबत अधिक सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ…

सोने-चांदीचे दर कमी होण्याची कारणे

  • ट्रम्प आणि जिनपिंग भेटीच्या दरम्यान अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार होण्याची दाट शक्यता

  • सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर मजबूत होणे, हे एक महत्वाचे कारण

  • भारत, कोरिया आणि इतर देशांसोबतच्या व्यापार करारांबाबत अमेरिकेची सकारात्मक भूमिका

  • या वर्षी सोन्याच्या किमती ५०% वाढल्या असल्याने गुंतवणूकदार नफा कमावतायत

  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह पाठोपाठ जपान आणि युरोपियन सेंट्रल बँक देखील व्याजदरात कपात करेल

  • सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ
  • ज्यांनी कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक केली , त्यांचा आता विक्रीकडे अधिकाधिक कल

  • अमेरिकेतील कमी व्याजदरांमुळे मोठे गुंतवणूकदार बाँड्सकडे वळतायत
  • मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदीचा जोर आता स्थिर होतोय, परिमाण दरांवर
  • लग्नाचा हंगाम २ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, पण बहुतांश लोकांची आधीच खरेदी पूर्ण

कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता म्हणाले की, सध्या नफा वसुली सुरू आहे. त्यामुळेच सोने आणि चांदीच्या किमती कमी होत आहेत.

भविष्यातील सोने आणि चांदीच्या दराचा अंदाज

हे गुपित नाही की सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंना केवळ गुंतवणूकदारांसाठीच नव्हे तर देशांसाठीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. याच कारणामुळे जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. भारतात सोनं हे फक्त दागिन्यांच्या रूपात नाही, तर भविष्यासाठीची बचत किंवा आकस्मिक परिस्थितीत उपयोगी ठरणारी मालमत्ता म्हणून लोक सोनं खरेदी करतात. तज्ज्ञांच्या मते सोनं आणि चांदी या दोन्ही धातू दीर्घकालीन सुरक्षितता देतात.

सध्या या दोन्ही धातूंच्या किंमती नफा-वसुलीमुळे घसरल्या आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की गुंतवणूकदारांनी थोडा काळ थांबून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. सोने अथवा चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही काळ थांबणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, जर आपण किरकोळ गुंतवणूकदार असाल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करीत असाल, तर थोड्या थोड्या प्रमाणात सोनं खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.

काही सराफा व्यावसायिक तसेच गुंतवणुकदरांचे मत विचारात घेतले असता, त्यांच्या मते सोने असो वा चांदी दोन्ही धातूंचे दर आगामी काही दिवसांत साधारणपणे १ लाखाच्या घरात स्थिरावतील, असा देखील अंदाज आता व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी तुम्ही आणखी काही काळ वाट पाहिली, तर त्याच्या तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News