अभिनेता आणि TVK प्रमुख विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

मोठी आणि धक्कादायक अशी बातमी तामिळनाडूच्या करूरमधून समोर येत आहे. याठिकाणी टीव्हीके प्रमुख आणि अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी आणि धक्कादायक अशी बातमी तामिळनाडूच्या करूरमधून समोर येत आहे. तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख विजय यांची रॅली होती. गर्दी इतकी मोठी झाली की चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चेंगराचेंगरी आणि श्वास गुदमरून अनेकांचा मृत्यू

टीव्हीके नेते विजय यांनी करूर येथे एक रॅली काढली, जिथे त्यांना त्यांचे भाषण वेळेपूर्वी संपवावे लागले. रॅलीदरम्यान लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. तर अनेकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. गर्दी प्रचंड वाढल्याने याठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तामिळनाडूच्या करूरमध्ये नेमकं काय घडलं?

समोर येणाऱ्या माहितीनुसार,  तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) प्रमुख विजय यांच्या नमक्कल आणि करूर येथील निवडणूक रॅलींना मोठी गर्दी जमली. त्यामुळेचे ही परिस्थिती उद्भवली. रॅलींदरम्यान विजय यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. विजय यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांचा पक्ष भाजपसोबत युती करणार नाही किंवा खोटी आश्वासने देणार नाही. त्यांनी राज्य सरकारवर रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून घटनेची दखल

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करुर येथे घडलेल्या या घटनेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्वीट केले की, माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिले. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एडीजीपींना जलद कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News