भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानात (Taliban Attack On Pakistan) मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा संघर्ष बघायला मिळाला. पाकिस्तान- अफगाणिस्तान बॉर्डर वरील हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी अफगाणी सैन्याने तब्बल 12 पाकिस्तानी सैनिकांची हत्या केली आहे, तर 5 पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडण्यात आले आहे. अफगाणिस्तान सैन्याने काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशातील तणाव चांगलाच वाढला आहे.
नेमकं काय घडलं ? Taliban Attack On Pakistan
भारतीय वेळेनुसार काल रात्री 9.23 वाजता अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानला लागून असलेल्या 2,670 किमी लांबीच्या सीमेवरील एकूण 7 सीमेवर असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर एकाच वेळी हल्ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास पाकिस्तान अपयशी ठरला. अफगाणिस्तानच्या या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले. पाकड्यांच्या लष्करी सुविधांचेही मोठे नुकसान झाले. इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, तर कुनार आणि हेलमंड प्रांतांमध्ये अफगाण सीमेवरील प्रत्येकी एक चौकी ताब्यात घेतली आहे. या हल्ल्याची काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

का केला हल्ला?
अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला (Taliban Attack On Pakistan) का केला? याचे कारणही स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानवरील हल्ला राजधानी काबूलवरील हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केल्याचे अफगाणिस्तानच्या सैन्याने म्हटले आहे. याबाबत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने वारंवार अफगाणिस्तानच्या पावित्र्याचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा अफगाण हवाई हद्दीचे उल्लंघन केले तर अफगाण सशस्त्र दल त्यांच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यास सज्ज आहे आणि अशाचप्रकारे प्रतिउत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे











