कुटुंबातील कलह विकोपाला, लालूंच्या मुलीने थेट देश सोडल्याची चर्चा, रोहिणी आचार्य गेली कुठे?

रोहिणी आचार्यने थेट देश सोडला असल्याचे समोर आले आहे. रोहिणी काल संध्याकाळी पक्ष आणि कुटुंब सोडून रडत रडत दिल्लीला पोहोचली होती. त्यानंतर ती परदेशात निघून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बिहार विधानसभेचे निकाल शुक्रवारी लागले. त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता लालूंच्या कुटुंबातून मोठी बातमी समोर आली आहे. लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी मी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडण्याचा निर्णय जाहीर करत असल्याचं सांगितलं आहे. त्यापेक्षा मोठी घडामोड म्हणजे लालूंच्या मुलीने थेट देश सोडला असल्याची माहिती समोर येत आहे. रोहिणी आचार्य नेमकी कुठे गेली ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रोहिणी आचार्य नेमकी कुठे गेली ?

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात झालेल्या वादानंतर लालू प्रसाद यांच्या तीनही मुली पटणा सोडून गेल्या आहेत. तिघीही कुटुंब आणि मुलांसह दिल्लीला रवाना झाल्या आहेत. रागिणी, राजलक्ष्मी आणि चंदा यादव दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. लालूंची आणखी एका मुली रोहिणी आचार्यने तर थेट देश सोडला असल्याचे समोर आले आहे. रोहिणी काल संध्याकाळी पक्ष आणि कुटुंब सोडून रडत रडत दिल्लीला पोहोचली होती. त्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रोहिणी आचार्य नेमकं कुठे गेलीअसा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शनिवारी घर सोडल्यानंतर रोहिणी आचार्यने म्हटले की, “त्यांचे कोणतेही कुटुंब राहिलेले नाही. त्यांनीच मला घरातून बाहेर काढले आहे. संजय-रमीजचे नाव घेतल्यावर त्रास दिला जातो. रोहिणी आचार्यने राजकारण सोडण्याबाबत म्हटले, “माझे कोणतेही कुटुंब नाही. त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढले आहे. त्यांना जबाबदारी घ्यायची नाही. संपूर्ण जग प्रश्न उपस्थित करत आहे की पक्षाची अशी स्थिती का झाली आहे?” रोहिणी आचार्य यांनी देश सोडला असून त्या सिंगापूरला गेल्या असल्याचे म्हटले जात आहे.

लालूंच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर

राजदमधील कुटुंबातील वाद काही नवीन नाहीत. परंतु निवडणुकीतील पराभवानंतरच्या घटनांमध्ये वेगाने होणारी उलथापालथ पक्षाच्या अंतर्गत कमकुवतपणा उघडकीस आणत आहे. लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांनी आधीच पक्ष आणि कुटुंब सोडले आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आरजेडीविरुद्ध निवडणूक लढवून आपला बंडखोर दृष्टिकोन उघडपणे दाखवला. आता, रोहिणी आचार्य यांच्या निर्णयामुळे लालू कुटुंबाच्या ऐक्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News