अलीकडच्या काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध विमान कंपन्या आकर्षक ऑफर्स जाहीर करत आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावर मोठ्या प्रमाणात सवलती, विशेष भाडे योजना आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. परदेशात प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आकर्षक संधी आहे. व्हिएतजेट ही विदेशी एअरलाईन कंपनीने प्रवाशांना एक खास ऑफर दिली आहे. व्हिएतजेट भारताच्या अनेक प्रमुख शहरांमधून व्हिएतनामला जाण्यासाठी अवघ्या 11 रुपयांपासून विमान तिकीट देत आहे. खरंतर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी उद्याचा दिवस ही शेवटची संधी असणार आहे.
व्हिएतजेट कंपनीची खास ऑफर
परदेशात प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आकर्षक संधी आहे. व्हिएतजेट ही विदेशी एअरलाईन कंपनीने प्रवाशांना एक खास ऑफर दिली आहे. व्हिएतजेट भारताच्या अनेक प्रमुख शहरांमधून व्हिएतनामला जाण्यासाठी अवघ्या 11 रुपयांपासून विमान तिकीट देत आहे. या किमतीत टॅक्स आणि एअरपोर्ट शुल्क समाविष्ट नाही. या सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी तुम्हाला 31 ऑक्टोबर 2025 आधी तिकीट बुकिंग करावे लागणार आहे.

11 रुपयांचे विमान तिकीट त्यांच्या प्रोमोशनल तिकीट अभियानाचा भाग म्हणून दिले जात आहे. हे तिकीट तुम्ही 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत बुक करू शकता. यासाठी तुम्हाला www.vietjetair.com किंवा Vietjet Air mobile app वर जाऊन बुकिंग करावे लागेल. या सवलतीच्या दरात बुकिंग केलेल्या तिकिटांवर तुम्ही 1 डिसेंबर 2025 ते 27 मे 2026 या दरम्यान प्रवास करू शकता.
ऑफरचा लाभ कसा घ्याल ?
या ऑफर अंतर्गत भारतीय ग्राहक दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळूरु आणि कोची या शहरांतून व्हिएतनाममधील हनोई , हो चि मिन्ह सिटी आणि ड-नांग या ठिकाणांसाठी तिकीट खरेदी करू शकतील. हे सवलतीचे तिकीट केवळ इकॉनॉमी क्लाससाठीच उपलब्ध असेल. पर्यटन हंगामात या ऑफर्सना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहक मिळवण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशी ऑफर समोर आली आहे.
व्हिएतनाममध्ये काय विशेष ?
व्हिएतनाम हा आशियातील एक सुंदर आणि ऐतिहासिक देश असून पर्यटनासाठी अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, पर्वतरांगा, समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वारसा जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो. हॅनोई आणि हो ची मिन्ह सिटी ही दोन प्रमुख शहरे आधुनिकतेसह पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवतात. हा लाँग बेचे नयनरम्य दृश्य, दा नांगचे बीचेस आणि होई अनचे प्राचीन शहर ही पर्यटनाची मुख्य आकर्षणे आहेत. स्वादिष्ट व्हिएतनामी खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक मंदिरे आणि स्थानिक बाजारपेठा प्रवासाला अधिक संस्मरणीय बनवतात.











