वेव्हज 2025 : प्रत्येक सर्जनशील कलाकाराला स्टार बनण्यासाठी सक्षम अणणारी लोकचळवळ, तीन दिवसात काय झाले?

Astha Sutar

waves summit 2025 – मुंबईतील बीकेसी येथे वेव्हज 2025 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. १ मे पासून ४ मे पर्यंत ही परिषद पार पडली. यात एकूण 3 दिवसांत 3000+ बीटूबी बैठका झाल्या. यात 1328 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या व्यावसायिक व्यवहारामुळे वेव्हज बाजारने केली उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र सरकारने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.

वेव्हज अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा रविवारी मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत  उत्साहात समारोप झाला.

50 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित

दरम्यान, जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी वेव्हज जाहीरनामा स्वीकारला आहे. वेव्हेक्स स्टार्ट अप ऍक्सलरेटरचा भाग म्हणून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. सृर्जनशील अर्थव्यवस्थेकरिता क्षमता उभारणीमध्ये भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (IICT) महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. तसेच वेव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित केले आहे.

जनतेकडून प्रचंड प्रतिसाद

या शिखर परिषदेत प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले. प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली.

मुख्य वैशिष्टये…

  • उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे
  • वेव्हज बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले
  • महाराष्ट्र सरकारने ‘माध्यम आणि मनोरंजन’ क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले
  • जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी ‘वेव्हज जाहीरनामा’ स्वीकारला
  • माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक
  • वेव्हज 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र
  • क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील  प्रतिभेचा जागतिक उत्सव
  • 8वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार
  • भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास
  • वेव्हजचा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

ताज्या बातम्या