Punjab heavy rain : पंजाबमध्ये (Punjab News) सध्या पूरजन्य परिस्थिती आहे. पूरामुळे पंजाबमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार पसरला आहे. वाढत्या पावसामुळे लोक आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. आपत्तीच्या या प्रसंगी लोकांना मदत हवी असते. अमृतसरच्या महिला अधिकारी त्यांना भक्कम आधार देत आहेत. अमृतसरच्या डीसी साक्षी साहनी ग्राऊंड झिऱोवर उतरून पूरग्रस्थांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. कोण आहेत साक्षी साहनी, ज्यांनी पाठीवर ठेवलेला एक हात लोकांना बिकट प्रसंगी मोठा दिलासादायक वाटत आहे.
कोण आहे साक्षी साहनी? l Who is Sakshi Sawhney?
साक्षी साहनी २०१४ बॅचच्या IAS साक्षी सहानी 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी सीएसई 2013 मध्ये ऑल इंडिया रँक सहावा मिळवला होता. ज्यानंतर ते पंजाब कॅडरमध्ये रुजू झाल्या होत्या. साक्षी स्वत: पंजाबमध्ये राहतात. अधिकारी होणं त्यांच्या डीएनएमध्येच होतं. त्याचे वडीलही आयआरएस अधिकारी होते आणि आई शाळेत मुख्याध्यापिका आहेत. साक्षी यांची बहीण बँकिंग क्षेत्रात काम करतात.

पहिल्या प्रयत्नात झाली होती चूक
साक्षी साहनी यांनी कॉलेजमध्ये असताना युपीएससीचा पहिल्यांदा परीक्षा दिली होती. २०१२ मध्ये पहिल्या प्रयत्नात काही मार्कांनी त्या मागे पडल्या. मात्र पुढच्या वर्षी त्यांनी खूप मेहनत केली आणि AIR 6 पटकावला.
IAS अधिकारी साक्षी यांनी नालसर विद्यापीठ ऑफ लॉ, हैदराबादमधून बीए एलएलबीची पदवी घेतली आहे. येथे त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्या बॅचमध्ये टॉप केलं. त्यांनी ८ गोल्ड मेडल पटकावले आहेत. या काळात त्यांना वकिली करण्याची इच्छा होती, मात्र कालांतराने त्यांनी नागरी सेवा हेच आपलं करिअर निवडलं.
ग्राऊंडवर उतरून केलं काम…
अमृतसरमध्ये डीसीच्या पदावर तैनात साक्षी साहनी यांनी प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध केलं. त्या लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरून काम करतात. सध्या पंजाबमध्ये पावसाने कहर केला आहे. अशाही परिस्थितीत साक्षी साहनी या रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो नागरिकांना रेस्क्यू केलं, आणि सतत बचावकार्यात सामील आहेत.











