Ajit Pawar On Sharad Pawar : माझं पवार साहेबांवर प्रेम, त्यांच्यामुळेच मी निवडून आलो- अजित पवार

माझं सुद्धा पवार साहेबांवर प्रेम आहे त्यांच्यामुळेच मी सुरुवातीला निवडून आलो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. आज बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

मागील काही दिवसापासून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar On Sharad Pawar) अशा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना जोर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती सुद्धा पाहायला मिळाली. त्यातच आज अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या बद्दल केलेले एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे .माझं सुद्धा पवार साहेबांवर प्रेम आहे त्यांच्यामुळेच मी सुरुवातीला निवडून आलो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. आज बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar On Sharad Pawar)

आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, आता लोकसभेला असं झालं, तसं झालं, हे सांगत बसू नका. एका बाजूला पवार साहेब, एका बाजूला मी होतो. त्यामुळे नेमकं काय करावं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतोय. परंतु मी जी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली. ते झाले गेले गंगेला मिळाले. पण आता जरा दिलदारपणा वाढवा. सगळे आपलेच आहेत. (Ajit Pawar On Sharad Pawar)

मी काय वरुन पडलो काय?

अजित पवार पुढे म्हणाले, काहींचे प्रेम साहेबांवर का नसावे??माझं सुद्धा पवार साहेबांवर प्रेम आहे. मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल, कालपर्यंत आपण सगळे एकच होतो हे कसं विसरता येईल त्यामुळे बारामतीकरांनो तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका असे अजित पवार यावेळी म्हणाले.

मला खासदारकीला ४८ हजार मते कमी पडली. मी मान्य केले की नाही? पण मग विधानसभेच्या वेळेस १ लाख मते कुठून आली? त्यामुळे झालं गेलं गंगेला मिळालं. काही गोष्टी सोडायच्या असतात. कऱ्हा नदीला मिळालं, सोनगाव वरून चंद्रभागेला मिळालं, असं अजित पवार म्हणाले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News