Anil Parab On Ramdas Kadam : रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?? अनिल परबांकडून नार्को टेस्टची मागणी

Asavari Khedekar Burumbadkar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृहदेह 2 दिवस तसाच ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले असा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या रामदास कदम यांचीच आता मोठी अडचण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab On Ramdas Kadam) यांनी आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच रामदास कदम यांच्या पत्नीचा मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?? असा सवाल करत रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अनिल परब यांनी केली.

काय म्हणाले अनिल परब? Anil Parab On Ramdas Kadam

अनिल परब म्हणाले, रामदास कदम यांनी दसरा  मेळाव्यामध्ये  नीचपणा केला. याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटतं नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. परंतु आता 14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? असा सवाल अनिल परब यांनी केला. मग 1993 मध्ये ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? ज्योती कदम यांनी खरंच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा अशा शब्दात अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. Anil Parab On Ramdas Kadam

अनिल परब पुढे म्हणाले, रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी.

शवपेटी शिवाय मृतदेह 2 दिवस कसा ठेवणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृहदेह 2 दिवस तसाच ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले या कदमांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले,  कोणतीही बॉडी दोन दिवस अशी ठेवता येते का? शवपेटीशिवाय मृतदेह ठेवता येते का? रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे. त्याला कोणी जे काही सांगितलं ना त्याने हा तरी विचार करायला हवा होता की, कोणताही मृतदेह शवागराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? अस म्हणत अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच आम्ही कोर्टात जाऊन रामदास कदम यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

ताज्या बातम्या