आज सकाळीच एक मोठी राजकीय घडामोड विदर्भातून समोर आली. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार त्यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे. तर दुसरीकडे इंद्रनील नाईक आता गोंदीयाचे नवे पालकमंत्री असणार आहे. त्यामुळे या निमित्ताने इंद्रनील नाईकांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
तब्येतीच्या कारणाने पद सोडल्याची चर्चा
बाबासाहेब पाटील यांनी काल गोंदियाचा पालकमंत्री पद सोडलं आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात, मात्र बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास होत नाही असं कारण त्यांनी दिलं आहे. तरी नुकताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भव्य मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्री वेळ देत नाहीत, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसाठी फक्त येतात. इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत असं म्हणत जोरदार टीका केली होती, हा मुद्दा देखील चर्चेला आहे.
इंद्रनील नाईकांवर पदाची मोठी जबाबदारी
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार असल्याची माहिती दिली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे. बाबासाहेब पाटील यांची राज्यातील राजकारणात सहकार क्षेत्रातील अनुभवसंपन्न आणि तळागाळातील शेतकरी नेते म्हणून आहे. बाबासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.











