BMC Election : महाविकास आघाडीत बिघाडी!! काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Asavari Khedekar Burumbadkar

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र मोठी बिघाडी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते विजय वडीवार यांनी केली आहे. एकीकडे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या या निर्णयामुळे ठाकरे बंधूंच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?? BMC Election

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. आम्ही सगळ्यांनी अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत. कारण हि निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांची असते.  कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. आधी आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढायचं असा आमचा निर्णय झाला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल.

महाविकास आघाडीचे काय ??

काँग्रेस स्वबळावर लढली तर महाविकास आघाडीचे काय?? असा सवाल केला असता विजय वडेट्टीवार म्हणाले, समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि युतीचा प्रस्ताव आला तर स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. तसेच  शरद पवार यांचा प्रस्ताव आला त्याचा पण विचार करू.

मुंबई महापालिकेत (BMC Election) आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. उलट आमच्या विरुद्ध जे तीन पक्षही सत्तेत वेगळे लढत आहेत. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट हे वेगळे लढणार आहेत. जर त्यांचे विभाजन होत नाही, तर आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

ताज्या बातम्या