मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी अखेर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे मराठ्यांचे कुणबी दाखले मिळतील आणि त्यांचा आरक्षणात सहभाग होईल अशी शक्यता निर्माण झाली. यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा अस्वस्थ झाला. आपलं आरक्षण जातंय की काय अशी भीती ओबीसी समाजाला वाटू लागली… मात्र आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, त्याच मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केलं आहे. Devendra Fadnavis On Maratha Aarakshan
ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही –
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलं. मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला नाही. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ( Devendra Fadnavis On Maratha Aarakshan) ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. एकीकडे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, तर दुसरीकडे ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
एकाचे काढून दुसऱ्याला देणार नाही – Devendra Fadnavis On Maratha Aarakshan
फडणवीस यांनी पुढे म्हटलं,आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठवाड्यात इंग्रजांचं शासन नव्हतं. 1948 पर्यंत निजामाचे शासन होते. त्यामुळे मराठवाड्यात जर एखाद्याला जातीचे प्रमाणपत्र हवे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही. महाराष्ट्रात इतर सगळ्या भागात आपण एखाद्याला जर जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे, ते आपण काढतो. त्यानुसार जातीप्रमाणे प्रमाणपत्र दिलं जातं.





