Devendra Fadnavis On Thackeray Brothers : बाळासाहेब ठाकरे खरे ब्रँड होते, तुम्ही नाहीत; फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीत. नुसतं नाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काही लोक म्हणत होते की त्यांच्याकडे ब्रँड आहे, पण आमच्या प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी त्यांच्या ब्रँडचा बँड बाजा वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, तुम्ही नाहीत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर (Devendra Fadnavis On Thackeray Brothers) केली.  तसेच आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जगातील सर्वात मोठा ब्रँड आहे असेही फडणवीस म्हणाले. मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis On Thackeray Brothers

आपल्या भाषणात फडणीस यांनी म्हटलं, बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं कशाला पक्षावर लढायचं. पण काहीजण म्हणाले आमचा ब्रँड आहे. परंतु आमच्या शशांक राव, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रँडचा वाजवला बँड, बँड-बाजा वाजवला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीत. नुसतं नाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही. (Devendra Fadnavis On Thackeray Brothers) आमचा पक्ष हा ब्रँड निर्माण करणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणीही आम्हाला ब्रँड बद्दल सांगू नये…जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि त्या ब्रँडचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे.

BMC वर महायुतीचाच झेंडा फडकणार

दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झालं तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या वेळी थोडक्याने वाचलो होतो, दोनच नगरसेवक कमी पडले होते. आपल्याला माहिती आहे की कमी पडल्यावर काय करायचे ते. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीच जिंकणार, महापौर महायुतीचाच असणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News