राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Eknath Shinde Big Decision For Flood Affected Farmers) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकारने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2200 कोटी रुपये मंजूर केले असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदारांनी खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहेत. शिंदे गटाच्या निर्णयामुळे संकटात असलेल्या बळीराजाला थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
शिवसेना कधीही आखडता हात घेणार नाही – Eknath Shinde Big Decision For Flood Affected Farmers
एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे आणि करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही सुद्धा दिली. यानंतर आपल्या सर्व आमदारांना खासदारांना एक महिन्याचा पगार अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची आदेश दिले. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Eknath Shinde Big Decision For Flood Affected Farmers

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही एक पगार देणार –
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व आमदार खासदार, मंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यात निधीत आपला आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच, सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे. पक्षाच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले.











