Eknath Shinde On Bjp : अहंकाराविरोधात एकत्र आलोय; शिंदेंचा पहिल्यांदाच भाजपवर नाव न घेता हल्लाबोल

उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं म्हणत शिंदेंनी भाजप वर निशाणा साधला..

Eknath Shinde On Bjp : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात मोठा तणाव पाहायला मिळतोय. अनेक नगर परिषदेत भाजप आणि शिंदे गट आमने-सामने आलाय. त्यातच भाजपकडून शिंदे गटातील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला गेल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. त्यातच आता उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं म्हणत शिंदेंनी भाजप वर निशाणा साधला..

नेमकं काय प्रकरण आहे – Eknath Shinde On Bjp

डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे. विरोधकांच्या या मोटीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं. डहाणूमध्ये आपण सगळे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. अहंकारामुळे रावणाची लंकाही जळून खाक झाली. आता 2 डिसेंबरला तुम्हाला तेच काम करायचं आहे असं म्हणतं एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. Eknath Shinde On Bjp

भाजपने दिले प्रत्युत्तर

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला भाजपकडून आता प्रत्युत्तर मिळालं आहे.  भाजप नेते आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी धाराशिव इथे बोलताना एकनाथ शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिले.  एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला जास्त सिरीयसली घ्यायची गरज नाही , आम्ही महायुती असलो तरी स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र लढत आहोत त्यामुळे असे वक्तव्य होत असतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News