भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील (Gopichand Padalkar On Jayant Patil) यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. जयंत पाटलांवर टीका करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांसह स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्यावर सुद्धा खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर सांगलीचा राजकारण सुद्धा तापल्याचे बघायला मिळेल. आता पडळकरांनी जयंत पाटलांवर आणखी निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. मंत्री असताना जयंत पाटलांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर? Gopichand Padalkar On Jayant Patil
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, सांगली जिल्ह्यातील व्यापारी रमेश पोरवाल यांचा मृत्यू बेळगावच्या रुग्णालयात झाला तेव्हा जयंत पाटील हेलिकॉप्टरनं बेळगावला गेले. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांनी रमेश पोरवालचे अंगठे घेऊन जमीन आणि शॉपिंग कॉम्लेक्स त्यांच्याकडून हडपले असा गंभीर आरोप गोपिचंद पडळकरांनी केला आहे. तसेच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले. (Gopichand Padalkar On Jayant Patil)

जयंत पाटलांनी साखर कारखाने सुद्धा हडपले
गोपीचंद पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत. जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने हडपले आहेत असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. याबाबत उदाहरण देताना पडळकर म्हणाले, जतमधील साखर कारखाना जयंत पाटलांनी 44 कोटींना घेतला. त्या साखर कारखान्याची 280 एकर जमिनीपैकी 10 ते 20 एकर जमीन विकून बँकेत पैसे भरले असते तर कारखाना वाचला असता. तसेच कुलकर्णी एस.के. नावाच्या व्यक्तीची ६ एकर जमीन हडपली गेली. एवढच नव्हे तर, स्वतःच्या इंग्रजी हायस्कूलसाठी १० एकर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोपही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केला आहे.