गुजरातच्या राजकारणात काल मोठी घडामोडी घडली. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल वगळता इतर सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर देशभरातून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. आता यामध्ये आज मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरातमध्ये आता नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली गेली आहे. त्यामुळे ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाची सुद्धा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली असून त्यामध्ये जाती आणि प्रदेश नेतृत्वाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसतंय. नव्या मंत्रिमंडळात एकूण 25 मंत्र्यांचा समावेश असून त्यापैकी 6 चेहरे हे जुनेच आहेत. हर्ष संघवी यांनी गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जितेंद्र वाघाणी आणि अर्जुन मोढवाडिया यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडला. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर 24 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा यांनाही मत्रिपदाची संधी मिळाली आहे.
नव्या मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे:
त्रिकम छंगा, स्वरूपजी ठाकोर, प्रवीण माली, ऋषिकेश पटेल, पीसी बरंडा, दर्शना वाघेला, कांतिलाल अमृतिया, कुंवरजीभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जुन मोढवाडिया, डॉ. प्रद्युम्न वाजा, कौशिक वेकारिया, परषोत्तम सोलंकी, जितेंद्र वाघाणी, रमण सोलंकी, कमलेश पटेल, संजयसिंह महीडा, रमेश कटारा, प्रफुल पानसेरिया, हर्ष संघवी, मनीषा वकील आणि ईश्वरसिंह पटेल.
सकारात्मक बदलासाठी मोठा निर्णय
गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने राजकारणात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. नवीन चेहरे सरकारमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रशासनात ताजेतवाने ऊर्जा आणि नवीन दृष्टिकोन येईल. यामुळे धोरणे अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जनाभिमुख होतील. नव्या नेत्यांच्या अनुभव, क्षमता आणि जनसंपर्कामुळे स्थानिक समस्या जलद सोडवता येतील. तसेच, युवा आणि उत्साही नेत्यांच्या सहभागामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ભારતીય જનતા પાર્ટીના મારા યુવા સાથી શ્રી હર્ષભાઈ સંઘવીને ગુજરાતના નાયબ મુખ્યમંત્રી તરીકે શપથ ગ્રહણ કરવા બદલ, તેમજ રાજ્ય મંત્રીમંડળમાં કેબિનેટ મંત્રી તથા રાજ્યમંત્રી તરીકે શપથ લેનાર સૌ સાથી મંત્રીશ્રીઓને હૃદયપૂર્વક શુભકામનાઓ પાઠવું છું.
માનનીય વડાપ્રધાન શ્રી નરેન્દ્રભાઈ મોદીના… pic.twitter.com/H5YmRfm4bB
— Bhupendra Patel (@Bhupendrapbjp) October 17, 2025











