MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मराठा आंदोलन पुन्हा पेटणार?; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपस्थितीत बैठक

Written by:Rohit Shinde
Published:
आज मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीत होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मराठा आंदोलन पुन्हा पेटणार?; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपस्थितीत बैठक

अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलनाचे वारे घुमू लागले आहे. आज अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाविषयी बैठक होत आहे. त्यामुळे सरकारचा ताप दुपट्टीने वाढण्याची शक्यता आहे. भाषिक मुद्यासोबतच ओबीसी आरक्षणावरून रान पेटण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाला गती मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज अंतरवाली सराटी मध्ये राज्यव्यापी बैठक होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आजच्या बैठकीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बैठकीची तयारी सुरू होती. विविध जिल्ह्यात या बैठकीसाठी अगोदर तयारी करण्यात आली होती.

मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी बारा वाजता आंतरवालीत मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी निर्णायक बैठक पार पडणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहणार असून आजच्या बैठकीत पुढची दिशा काय ठरते आणि काय भूमिका जरांगे पाटील घेणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी

ओबीसी कोट्यातूनच समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. सगे-सोयरेची अंमलबजावणी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, तर जीव गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना मदत तसचे कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा या प्रमुख मागण्यांवर समाज ठाम आहे. यापूर्वी जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी मुदत दिली होती. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व आले आहे.