Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार?? देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे विधान

नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज अकोला  जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची  जाहीर सभा पार पडली.  या सभेत बोलताना फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केलं

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सातत्याने केला जातोय, मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या योजनेबाबत दिलासादायक बातमी दिली आहे. जोपर्यंत देवाभाऊ सीएम आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाला दिले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Ladki Bahin Yojana)

नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज अकोला  जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची  जाहीर सभा पार पडली.  या सभेत बोलताना फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केलं. आमच्या महाराष्ट्रातील विजयाला 23 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. Ladki Bahin Yojana

आम्ही निवडणुकापुरते आश्वासन देत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना शिक्षण, आरोग्य आणि घरांची सुविधा दिली. आम्ही लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज, पिक विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल. तसेच


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News