भाषणातून एकनाथ शिंदेंचा लाडक्या बहिणींना मोठा संदेश; योजना सुरू राहणार की बंद होणार? उत्तर मिळाले…

विरोधकांकडून वारंवार आता लाडकी बहीण ही योजना बंद होणार असल्यचां बोललं जात आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी या विषयावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज नेस्को सेंटर येथे पार पडला. एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणाहून 15 ट्रकद्वारे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदे व्यासपीठावर भाषणासाठी गेल्याचं पाहायला मिळालं. तर, व्यासपीठावर कुठलाही सत्कार न स्वीकारता त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळीबळीराजा संकटात असल्याने राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात थांबायला सांगितलं. यावेळी शिंदेंनी नानाविध मुद्द्यांवर भाष्य केले.

लाडकी बहीण योजना सुरू राहणार -शिंदे

सरकारने पुन्हा एकदा या लाडकी बहीण योजनेचा आता आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार आता ही योजना बंद होणार असल्यचां बोललं जात आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, खरचं ही योजना बंद होणार का? अशी भीती देखील अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  नेमका हाच संभ्रम दूर करण्याचं काम आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात केलं आहे, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, सुरूच राहणार असल्याचं त्यांनी आजच्या दसरा मेळाव्यात म्हटलं आहे.

“दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत…”

“बळीराजाचं दु: मोठं आहे, त्याचं पशुधन वाहून गेलंय, जमीन खरडून गेलीय, घरांची पडझड झालीय. मी स्वत: बांधावर जाऊन बळीराजाचं दु:ख पाहिलं आहे. त्यामुळेच, बाळासाहेबांचा मुलमंत्र 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण आपण जपत आहोत. जिथं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धाऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.” अशा शब्दांत आपण शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलासा दिला आहे.

उद्धव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे टीकास्त्र

राज्यात याचं सरकार असतं तर काहीच सुरू झालं नसतं, हे स्थगिती सरकार होतं. मी मुख्यमंत्री झालो हे सर्व स्पीडब्रेकर उडवून टाकले. सर्व सण बंद होते, मंदिरं बंद होती, मी आलो आणि सर्व हटवलं. दुसऱ्या टप्यात आम्ही एकत्र येऊन आजही वेगाने काम करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या मागे उभे आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.


About Author

Rohit Shinde

Other Latest News