ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे आणि मराठा समाजातील प्रस्थापितांना थेट शिंगावर घेणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप (Laxman Hake Audio Viral) सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये एक तरुण स्वतःहून हाकेना लाख रुपये देतो असे म्हणतो आणि यूपीआय आयडीची मागणी करतो…. सुरुवातीला नाही नाही म्हणणारे लक्ष्मण हाके अखेर त्याला यूपीआय नंबर देतात आणि नंबर देताच कॉलवर बोलणारा तरुण अक्षरशः लक्ष्मण हाके यांची लाज करतो…
काय आहे कथित ऑडिओ क्लिप मध्ये ?
लक्ष्मण हाके – बोला
तरुण: तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला किंवा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढा आपल्यासाठी पळत आहे
लक्ष्मण हाके – काय देताय मानधन…कुठलं गाव
तरुण – अकलूज.. तुम्हाला कधी समोर कुठे भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळत आहे… गाडीसाठी तेल लागतं… तर कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे…
लक्ष्मण हाके – धन्यवाद दादा …. भेटल्यावर द्या…
तरुण – तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर… त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल…
लक्ष्मण हाके – नाही राहू द्या… अकलूज परिसरात आल्यावर भेटू ..
तरुण : नाही… भेटण्यापेक्षा युपी आयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते.. डायरेक्ट… तुम्ही कधी यायचा काय… आम्ही पण बाहेर पुण्याला असतो…
लक्ष्मण हाके – पुण्यातच आहे मी राहायला… कुठे राहता…
तरुण – कोथरूड
हाके : उद्या आहे पुण्यात सकाळी…(Laxman Hake Audio Clip)
तरुण – ऑफिसला जाताना येतो… तुमचा युपीआय नंबर असेल तर द्या ना…
हाके – पाठवतो एक मिनिट… रितेश गुगल पे फोन पे नंबर दे…
तरुण: सांगता का मला
हाके – रितेश बाहेरवाड यांनी फोन पे नंबर सांगितला…
तरुण – सरांचा फोन पे नंबर नाही का…
हाके – ऐका ना माझा अकाउंट नाही… रितेश माझा ड्रायव्हर आहे… अकाउंटला मी पैसे घेत नाही…
तरुण – तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हालाच सहकार्य करतेत … तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे घेता… सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याच बोलता… लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला… जनाची नाही तर मनाची… समाजाच्या विरुद्ध भडकवताय. . जरांगेंला बोलता…. सुपार्या घेता… जनाची नाही तर मनाची… शहाजी बापूच्या विरोधात उभारला 200 मते पडली नाहीत…. तुझी औकात नाही साल्या…. तू समाजाच्या विरोधात काम करतो… असं म्हणत सदर तरुणाने हाके यांच्यावर निशाणा साधला…

हाके यांची प्रतिक्रिया –
दरम्यान हा सगळा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके ( Laxman Hake Audio Clip) यांनी दिली. एक व्यक्ती मला पैशाची ऑफर करत होता. तो व्यक्ती पहिल्यांदा जय मल्हार म्हणाला. मी अकलूजचा आहे. त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची. तो म्हणाला की गुगल पे पाठवा मी म्हणालो माझ्याकडे तसं काही नाही. परत तो म्हणाला की दुसऱ्या कोणाचा असेल तर द्या मी ड्रायव्हर कडे फोन दिला. त्याने ते रेकॉर्ड केलं आणि व्हायरल केलं असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.











