Maharashtra Politics : शिंदेंनी कडक भूमिका घेतली म्हणून भाजप….; मंत्र्याने सुनावले खडेबोल

आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली. २०२२ ला आणि आम्ही ५० आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप सत्तेमध्ये आली

Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप मध्ये कलगीतुरा बघायला मिळतोय. दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून सुद्धा शिंदे गट आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी ‘पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, गोद में हम अपने घर के बच्चे को उठाते हैं’ असे विधान नुकतंच केले होते. यांवर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदेंचे खास शिलेदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जुन्या इतिहासाचा दाखला देत मंगलप्रभात लोढा यांना आरसा दाखवला आहे. एकनाथ शिंदेंच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आली हे लोढा यांनी लक्षात ठेवाव असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

काय म्हणाले शंभूराज देसाई? Maharashtra Politics

प्रसारमाध्यांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, २०१४ नंतर जी राजकीय स्थित्यंतरे महाराष्ट्रात घडली, थोडं मंगल परभात लोळाली त्याच्याकडे सुद्धा पाठीमागे वळून बघितलं पाहिजे. कारण २०१४ ते २०१९, जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण २०१९ नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधून झाला. Maharashtra Politics

शिंदेंनी कडक भूमिका घेतली

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली. २०२२ ला आणि आम्ही ५० आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की, आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो.

कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी विचारविनिमय करूनच घेत होते. आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत, जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळे महायुतीला २०२४ ला प्रचंड यश मिळालं असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News