MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

मंगेश चव्हाणांचे खडसेंवर अनैतिक संबंधांचे आरोप; ‘पुरावे द्या, संन्यास घेईन’ खडसेंचे चॅलेंज

Written by:Rohit Shinde
Published:
आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अनैतिक संंबंधांचे गंभीर आरोप केले होते. त्यावर आता खडसेंनी चव्हाणांना आव्हान दिले आहे.
मंगेश चव्हाणांचे खडसेंवर अनैतिक संबंधांचे आरोप; ‘पुरावे द्या, संन्यास घेईन’ खडसेंचे चॅलेंज

काही दिवसांपूर्वी जळगावात पत्रकार परिषद घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर महिलांसोबतच्या अनैतिक संंबंधांचे गंभीर आरोप केले होते. त्यावर आता खडसेंनी चव्हाणांना आव्हान दिले आहे. ‘पुरावे द्या, पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास घेईन’ असे खुले चॅलेंज एकनाथ खडसेंनी मंगेश चव्हाणांना दिले आहे. आता खडसेंच्या या आव्हानावर आमदार मंगेश चव्हाण काही पुरावे अथवा प्रतिक्रिया देतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मंगेश चव्हाणांचे खडसेंवर काय आरोप?

मंगेश चव्हाणांनी केलेल्या आरोपानुसार ” एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता,” असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  “मी मुक्ताईनगरमध्ये येतो, जाहीरपणे दोघे पत्रकार परिषद घेऊन एकमेकांसमोर येऊन बोलू, गिरीश महाजन यांच्यापेक्षा मी विकासाच्या बाबतीत सरस आहे, असं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगरमध्ये येईल.” असं जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिलं आहे.

पुरावे दिल्यास राजकारण सोडेन -खडसे

मंगेश चव्हाणांच्या या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “मी मंगेश चव्हाण यांना आव्हान देतो की माझ्या विरुद्ध एक छोटीशी गोष्ट जरी पुरावा म्हणून तुमच्याकडे असेल तर ती समाजाला दाखवा गप्पा मारू नका. तसे पुरावे असतील तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्त होईल.” असं आव्हान खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले आहे. आता मंगेश चव्हाण खडसेंचे हे चॅलेंज स्वीकारतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“शुक्रवारी भाजपच्या सर्व आमदारांनी जळगाव मध्ये पत्रकार परिषद घेतली. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेण्याची ही पहिली वेळ असावी पण जर ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी घेतली असती तर आनंद वाटला असता पण ती एकनाथ खडसेंना टार्गेट करून करण्यासाठी घ्यावी लागली.त्यामागील त्यांची मजबुरी मी समजू शकतो.” अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेणाऱ्या आमदारांवर टीकेच तोफ डागली आहे.