दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंचे भावनिक भाषण; मराठा समाजाला जरांगेंकडून मोलाचा कानमंत्र

हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत नारायण गड परिसरात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मनोज जरांगे आक्रमक भाषण केलं असलं तरी ते भावनिक देखील झाले. यावेळी त्यांना शेतकरी, पूर, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांना स्पर्श केला.

मनोज जरांगे यांनी बीडमधील नारायण गडावर जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित केले. यावेळी जरांगे यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. ते भाषणादरम्यान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत नारायण गड परिसरात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मनोज जरांगे आक्रमक भाषण केलं असलं तरी ते भावनिक देखील झाले. यावेळी त्यांना शेतकरी, पूर, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांना स्पर्श केला. मनोज जरांगेंचे आजचे भाषण लक्षवेधी अशा स्वरूपाचे होते.

मनोज जरांगे-पाटील भावनिक

मनोज जरांगे यावेळी भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. यावेळी बोलताना ते मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे असं म्हणत त्यांनी सर्वांनाच एक धक्का दिली. मी जिवंत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देताना आपल्याला पाहायचे होते. ते स्वप्न आपण मुंबईत जीआर हाती घेवून पूर्ण केलं आहे. त्याचे आपल्याला समाधान असल्याचं ते यावेळी म्हणाले.

“मराठ्यांनो शासक-प्रशासक व्हा”

मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचे आहे. हा एक शब्द आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगत आहे. मराठ्यांनी डोके लावून आणि हुशारीने शासक आणि प्रशासक बनायचे. शासक बनलात तर कोणाला मागायची गरज पडणार नाही. शेतात काम करता करता, घरात काम करा…लेकरांना घडवा. तसेच आपल्या जातीवर काही संकट आले, तर एकसंध उभे रहा, असा सला मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला दिला.

भाषणातील जरांगेंच्या काही मागण्या

  • आजच्या भाषणात मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेटची वेगाने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
  • सातारा, औंध संस्थानचे गॅझेट तात्काळ लागू करावेत, अशी मागणी यावेळी जरांगेंनी केली.
  • पुरामुळे शेती-पिकांचे नुकसान झालेल्यांना भरघोस मदत सरकारने करावी.
  • मुंबईत मराठ्यांना दिलेली आश्वासने वेळेवर पूर्ण करा, अन्यथा पाहू, असा इशारा.

यावेळी सरकारला दिवाळी संपेपर्यंतचा वेळ मनोज जरांगेंनी वरील मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सरकारी पातळीवर नेमक्या कशी हालचाली घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News