Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक झाली. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन पुकारलेल्या मराठा समाजाला या बैठकीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर गुलाल उधळून आंदोलकांनी मुंबईत आनंद साजरा केला. दरम्यान यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि त्यांचे आभार मानले. (Manoj Jarange Maratha Morcha)
कुठेही तोल ढळू दिला नाही…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे राहून सातत्याने कायदेशीर सल्लामसलत केली. राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या 4 बैठका घेतल्या. मागण्यांच्या अनुषंगाने मसुदा तयार केला. प्रत्येक निर्णयाचा GR तयार ठेवला आणि संपूर्ण तयारी केल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला चर्चेला पाठवलं. मसुदाच असा तयार केला की तो जरांगेंना तो पहिल्या बैठकीत मान्य करावा लागला, कुठेही चर्चेच्या फेऱ्या कराव्या लागल्या नाही. या संपूर्ण आंदोलन काळात त्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले गेले, शिवीगाळ केली गेली, पण त्यांनी संयम दाखवला, कुठेही तोल ढळू दिला नाही. त्याचवेळी त्यांचे सामान्य कार्यक्रम सुरू ठेवले. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे मोठे महत्त्व आहे, त्यामुळे त्यांनी गणपती दर्शन जारी ठेवले. मुंबई, पुणे, नागपूर येथील गणेश मंडळांना भेटी दिल्या. दरवर्षी सर्व वाहिन्यांमधील गणपती आरतीला मुख्यमंत्री जातात. यावेळी वाहिन्यांमध्ये गेल्याने वेगळा संदेश जाऊ शकतो, ही भीती होती, पण त्याची पर्वा न करता आपला वार्षिक क्रम त्यांनी कायम ठेवला. समाजमाध्यमांवर काही प्रतिक्रिया आल्या, पण त्याची पर्वा केली नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून केल्या जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाला न्याय
१. आंदोलकांशी संवेदनशीलतेनं वागावं, कोणताही त्रास होऊ नये, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना होत्या सूचना
3. आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांना निर्देश
४. जरांगेंच्या उपोषणावर आणि आंदोलनावर मख्यमंत्र्यांचं गांभिर्यानं लक्ष
५. मुख्यमंत्री फडणवीस सातत्यानं होते कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात
६. मराठा आरक्षण उप समितीकडून लहान सहान गोष्टींचा आढावा, वर्षावर बैठका
७. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं सुटला आरक्षणाचा तिढा
८. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन मुंबईतील मराठा आंदोलनावर तोडगा
9. जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा विचार करत तोडग्यासाठी कायदेतज्ज्ञांशी आणि महाधिवक्तांशी बोलून नवा जीआर
१०. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं काढण्यात आलेल्या जीआरला जरांगे पाटील यांनाही मान्य











