Mumbai Local Train : मुंबई लोकलचा कायापालट होणार!! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

आता आम्ही लोकलचे सर्व डब्बे हे मेट्रोप्रमाणे एअर कंडिशन करणार आहोत. त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये हा सर्वात मोठा बदल होत असला तरी सर्वसामान्य प्रवाशाला कोणताही अधिकच आर्थिक फटका बसणार नाही,

Mumbai Local Train : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनचा आता कायापालट होणार आहे. आता मुंबई लोकल ट्रेनचे सर्व डबे मेट्रोप्रमाणे संपूर्ण वातानुकूलित AC करण्यात येणार आहे. मागील काही महिन्यात मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या अपघाताची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाल. तेव्हापासूनच मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार येणार असल्याची चर्चा जोरात सुरु होती. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात याबाबत घोषणा करत मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम केलं आहे.

काय म्हणाले फडणवीस? Mumbai Local Train 

युनायटेड नेशन्सचे भारतीय मॉडेल (IIMUN) आयोजित युथ कनेक्ट सत्रात Involvement of Youth in Governance या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकल ट्रेनच्या होणाऱ्या कायापालटची माहिती दिली. मुंबईची जी लोकल आहे, ज्यातून साधारण ९० लाख लोक दररोज प्रवास करतात. लोकलमध्ये आजही लोक लटकून प्रवास करतात. यात जो खरा मुंबईकर आहे तोच प्रवास करू शकतो. ऐन गर्दीच्या वेळी बाहेरची व्यक्ती त्या लोकलमध्ये घुसूच शकत नाही, यासाठी आम्ही आता मुंबई लोकल ट्रेन मध्ये मोठा बदल करणार आहोत. आता आम्ही लोकलचे सर्व डब्बे हे मेट्रोप्रमाणे एअर कंडिशन करणार आहोत. त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये हा सर्वात मोठा बदल होत असला तरी सर्वसामान्य प्रवाशाला कोणताही अधिकच आर्थिक फटका बसणार नाही, कारण रेल्वेच्या तिकिटात कोणतीही वाढ होणार नाही. सध्याच्या किमतीतीच मेट्रो प्रवासाप्रमाणे अनुभव लोकल प्रवास करता येणार आहे, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. Mumbai Local Train

अंडरग्राउंड बोगदे होणार –

पुढील सात वर्षांत मुंबईचा सरासरी वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचावा यासाठी मुंबई भूमिगत बोगद्यांचे एक मोठे जाळे तयार करत आहे, जे सध्या गर्दीच्या वेळी सरासरी १५ ते २० किमी प्रतितास आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. “मुंबईच्या वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही पथल लोक (भू-बोगद्यांच्या जाळ्याखाली) तयार करत आहोत. वांद्रे सी लिंकवरून, एक बोगदा तयार केला जाईल जो बीकेसीला जोडेल आणि दुसरा बोगदा जो वाहतूक थेट मुंबई विमानतळावर नेईल. “या बोगद्याचे उद्दिष्ट बीकेसीची गर्दी कमी करणे आणि लोकांना कमीत कमी वेळेत विमानतळावर पोहोचवणे आहे,” असे फडणवीस म्हणाले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News