Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी?

यंदा निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम (Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule) जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषेद घेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनुसार राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हि मात्र मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे.

कधी आहे मतदान आणि निकाल – Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule

यंदा निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. 15 नवीन नगरपंचायत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 10 नोव्हेंबरपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 17 नोव्हेंबर हि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल. 21 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. तसेच 26 नोव्हेेबरला निवडणूक चिन्ह वाटप होईल. Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule

विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक

कोकण – 17
नाशिक -49
पुणे -60
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News