भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती बिघडलेली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारायण राणेंना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे (Narayan Rane Admitted In Hospital). उद्या म्हणजेच गुरुवारी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया पार पाडणार आहे. राणेंना अचानकपणे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राणेंना नेमकं काय झालं?? Narayan Rane Admitted In Hospital
नारायण राणे यांना अचानक नेमकं काय झालं कशामुळे त्यांची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही यापूर्वी तीन वर्षांपूर्वी राणेंवर लीलावती रुग्णालयात एन्जोप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचे डॉक्टरांना आढळून आले होते. आता मात्र राणेंना कोणत्या कारणासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उद्या कोणती शस्त्रक्रिया होणार आहे याबाबतचे कोणते अपडेट्स अजूनही समोर आलेले नाहीत.
नारायण राणे कोकणातील बडे नेते
नारायण राणे हे कोकणातील भाजपचे बडे नेते आहेत. नारायण राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. खास करून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ते सातत्याने जोरदार टीकास्त्र सोडत असतात. त्यांची दोन्ही मुले हे सध्या आमदार आहेत. नितेश राणे हे कणकवली विधानसभेचे आमदार आहेत तर निलेश राणे हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणे हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. महाराष्ट्रातील अनेक विषयांवर ते सातत्याने आपले मत मांडत असतात. विरोधकांवर टीका करत असतात .आज मात्र त्यांना अचानक रुग्णालयात दाखल (Narayan Rane Admitted In Hospital) करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





