पंकजा मुंडेंचा भगवान गडावरील दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा भरतो. हा मेळावा स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू झाला असून त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे ही परंपरा पुढे नेत आहेत.
भगवान गडावर यंदा भव्य दसरा मेळावा
वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे.या मेळाव्याचे हे 11 वे वर्ष असून राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त – मुंडे समर्थक लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात.संत भगवान बाबाच्या जन्मभूमी असल्या कारणाने सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्याला महत्व आहे.

दसरा मेळावा हा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावर व्हायचा. 2014 साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा घेतला. मात्र ज्या व्यासपीठावरून दसरा मेळाव्यातील भाषण होत होते ते ते व्यासपीठ भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय कार्यक्रमाचे कारण देत पाडून टाकले.इथूनच गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे मध्ये निर्माण झालेला दुरावा आजतागायत कायम आहे.
पंकजा मुंडेंनी पुढे 2015 साली भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. 2016 च्या दसरा मेळाव्याचे ठिकाण हे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट ठरवण्यात आले. हे ठिकाण ठरवताना पंकजा मुंडे यांनी याबाबत प्रचंड गुप्तता बाळगली आणि त्यानंतर त्यांनी येथे मेळावा घेत मोठे शक्ती प्रदर्शनही केले होते.
दसरा मेळाव्याला 11 वर्षांची दीर्घ परंपरा
लोकसभा निवडणुकी पासूनच मुंडे बहीण भावांमधील दुरावा संपला आणि त्याचाच परिणाम म्हणून 2024साली भगवान भक्ती गडावर झालेल्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. 11 वर्ष पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याचे हे असून सावरगाव घाट येथील हा 10 वा दसरा मेळावा आहे. यंदा देखील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची या मेळाव्याला एकत्रित उपस्थिती असणार आहे.
सावरगाव घाट येथे पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचत असलेली राष्ट्रसंत भगवान बाबाची भव्य मूर्ती आणि तळघरात भगवान बाबांची मूर्ती अशा स्वरूपाची भव्य वास्तू येथे असून वंजारा समाज बांधवासह ओबीसी समाज बांधव या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने येथे उपस्थित असतो.











