आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या राजकीय हालचाली (Politics News) आणि घडामोडी पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असताना कर्जत मध्ये काही भलतंच घडलं आहे. कर्जतमध्ये चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे युती होण्याची शक्यता आहे. याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने मोठा खुलासा केला आहे.
कर्जतमध्ये हालचाली वाढल्या (Politics News)
खरंतर कर्जत मध्ये शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलेच हाडवैर अनेकदा पाहायला मिळालं आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी राजकीय नीती रायगड मध्ये जुळून येण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना UBTचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यात गुप्त बैठका झाल्या आहेत. या बैठकीला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठीच दादांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे कर्जत मतदार संघात परिवर्तन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना आमने-समाने येण्याची शक्यता आहे. या संभाव्य युतीवरून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

तटकरेंनी मात्र युतीच्या चर्चा फेटाळल्या
एकीकडे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा सुरू (Politics News) असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दोन्ही पक्षाचे नेते केवळ दिवाळीनिमित्त एकत्र आल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत असतात. राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अशावेळी महिंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीच्या चर्चाना आणखी बळ मिळताना दिसतंय.











