MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

रोहिणी खडसेंचा बालपणीचा मित्र ते जीवनसाथी; एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत?

Written by:Rohit Shinde
Published:
रेव्ह पार्टीतून अटक झाल्यानंतर प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत? ते काय करतात, खडसेंचे जावई कसे झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रोहिणी खडसेंचा बालपणीचा मित्र ते जीवनसाथी; एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत?

पुण्यात उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करीत ही पार्टी उद्ध्वस्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग होता. पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिचा पती प्रांजल खेवलकर याचा सहभाग होता. प्रांजल खेवलकर अटकेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत? ते काय करतात, खडसेंचे जावई कसे झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रोहिणी खडसेंचा बालमित्र ते जीवनसाथी

एकनाथ खडसे यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी शारदा हिचा गिरीश चौधरी यांच्याशी विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी दुसरा विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा पहिला पतीपासून घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर त्यांनी बालमित्र प्राजंल खेवलकर यांच्याशी लग्न केलंय. ते खडसेंचे दोन नंबरचे जावई आहेत. रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत.

प्रांजल खेवलकर एक उत्तम व्यावसायिक

खेवलकर हे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. प्रांजल खेवलकरांनी त्यांच्या प्रभावी व्यावसायिक कौशल्यामुळे अनेक उद्योगांमध्ये यश मिळवले आहे. साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीची भूमिका बजावलीय. त्यांची संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड ही कंपनी ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. त्यांची एपी इव्हेंट्स अँड मीडिया ही कंपनी आहे. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी आहे.

आमच्या विरोधात षडयंत्र रचले -खडसे

आज पुण्यात घडलेल्या त्या रेव्ह पार्टीच्या प्रकणानंतर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.या कारवाईवर मात्र एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केलाय. आमचे जावई दोषी असतील तर मी त्यांचे समर्थक करणार नाही. पण हे सर्व घडतंय की घडवलं जातंय, अशी शंका एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलंय. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी हे घडणार होतं तरी जावयाला सांभाळला हवं होतं, असा टोला लगावलाय. आता या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. तपासानंतर या प्रकरणातील आणखी काही लागेबांधे समोर येण्याची शक्यता आहे.