Sanjay Raut : आजारी असतानाही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी; शिवसैनिक भावुक

संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं

Sanjay Raut । हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. त्यातच आज शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार संजय राऊत हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले. खरं तर आजारी असतानाही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दाखल झाले. संजय राऊतांना पाहून शिवसैनिक अक्षरशः भारावून गेला, भावुक झाला.

संजय राऊतांना गंभीर आजार – Sanjay Raut

खरं तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत माहिती दिली होती कि ते एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही महिने बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घातले होते. अनेक दिवसापासून त्यांची रोजची पत्रकार परिषद सुद्धा बंद आहे. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी संजय राऊत यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट दिली आणि अभिवादन केलं. संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं. शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक झाल्यावर त्यांनी शिवसैनिकांच्या दिशेने हात उंचावले. त्यामुळे शिवसैनिकही भारावून गेले.

संजय राऊत म्हणजे शिवसेनेची बुलंद तोफ

दरम्यान संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून समजले जातात. एकनाथ शिंदे सोबत ४० आमदार गेले, निवडणूक आयोगाने ठाकरेंचे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यावेळी संजय राऊतच शिंदे गटावर हल्लाबोल करत होते. देवेंद्र फडणवीस असो व पंतप्रधान नरेंद्र मोदी … संजय राऊतांची तोफ रोज सकाळी धडाडताना उभा महाराष्ट्र पाहत असतो. संजय राऊत हे मधल्या काळात तुरुंगातही जाऊन आले मात्र त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. आजही ते शिवसेनेचा आवाज म्हणून ओळखले जातात. संजय राऊत जे काही बोलतात ती शिवसेनेची अधिकृत भूमिका असते असं मानलं जातं. मात्र आज हेच संजय राऊत एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने शिवसैनिक चिंतेत आहे. राऊत लवकरात लवकर बरं होवो अशा प्रार्थना शिवसैनिकांकडून केल्या जात आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News