बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. दुपारपर्यंतच्या कलांनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एनडीएला सुमारे 200 जागा मिळताना दिसत आहे, तर महाआघाडीला 50 च्या आतच समाधान मानावे लागू शकते असे चित्र आहे. या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. नेमकं संजय राऊत काय म्हणाले, ते सविस्तर जाणून घेऊ…
निकालावर संजय राऊतांचे काय भाष्य?
बिहार विधानसभा निवडणूक निकालावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ते भाजप आणि मोदींचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात. आता बिहारच्या निकालावर संजय राऊत यांनी काय म्हटलय? तर “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!. एकदम महाराष्ट्र पॅटर्न!. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

मागच्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला. महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांमध्ये आटोपलेली. त्यावेळी भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेलला. भाजपने 125 पेक्षा जास्ता जागा जिंकलेल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि त्याखालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. एकूणच या निकालावर आता विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यास सुरूवात झाली आहे.
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
बिहारमध्ये भाजप, जदयुला प्रचंड मोठं यश
बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करताना दिसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पुढे आली असून एनडीएला बहुमत मिळतंय. एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला.
90 विधानसभेवर भाजपा उमेदवार सुरूवातीपासूनच आघाडीवर बघायला मिळाली. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त होते. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नंबर दोनचा पक्ष जेडीयू ठरला असून जेडीयूने मुख्यमंत्रिपदाचा दावा केलाय.











