MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

केंद्र व राज्य सरकारला धडा शिकवा, खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर; हर्षवर्धन सपकाळांची भाजपावर खोचक टिका

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
देशात व राज्यात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला वेळीच धडा शिकवला पाहिजे. आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा तिरंगा फडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं सपकाळ यांनी म्हटलेय.
केंद्र व राज्य सरकारला धडा शिकवा, खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर; हर्षवर्धन सपकाळांची भाजपावर खोचक टिका

Congress – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही अजून या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. अद्याप आरक्षणही जाहीर झालेले नाही. परंतु काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसताहेत. त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात.

खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, अशी टिका काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर केली.

राहुल गांधींसोबत देश उभा

राज्य सरकारमध्येही तिघांत वाद सुरु आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. केंद्र व राज्य सरकारचा हा गैर कारभार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे. राज्यघटना व लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे जनतेला सांगितले पाहिजे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेले घोटाळे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवण्याची गरज आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठी लढत आहेत, या लढाईत देशातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे…

मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राज्यात मराठा समाजाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने आरक्षण दिले होते. जातनिहाय जनगणना करावी हा काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे, काँग्रेस पक्षाचे सरकार असलेल्या तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी ही भूमिका आहे असे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

सरकारला धडा शिकवला पाहिजे

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात नारा दिला आहे, ‘वोट चोर, गद्दी छोड’, त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस रस्त्यावर उतरेल हा संकल्प आज करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारच्या कामाचा पर्दाफाश करण्याचा निश्चयही करण्यात आला आहे. अत्याचारी महायुती सरकारला या निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे यावरही चर्चा झाली. महायुती सरकारने मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अजून झालेली नसून मराठवाड्याचे मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असेही आमदार अमित देशमुख म्हणाले.

अजित पवारांचा राजीनामा घ्या…

राज्यात दारु दुकानांच्या परवान्यांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुच्या व्यवसायाशी संबंध आहे. उत्पादन शुल्क विभाग अजित पवार यांच्याकडे आहे, यात उघडपणे conflict of interest दिसत असून मंत्रीपदाचा दुरुपयोग केलेला आहे. या प्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा असे सपकाळ म्हणाले.