शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यात चांगलाच चर्चेत आहे. फडणवीस सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू अशी घोषणा केली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शेतकऱ्याची चेष्टा करत शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, करताय, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करतो असं बोललो होतो. त्यासाठी काही पैसे खर्च करावं लागतं ना? असे विधान केलं होते. या विधानावरूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना (Uddhav Thackeray Slam Ajit Pawar) सुनावलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे – Uddhav Thackeray Slam Ajit Pawar
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकर्यांशी संवाद साधताना अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. अजित पवार म्हणतात जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. अजित पवार बेधडक बोलत आहेत की जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. शेतकऱ्यांनो तुम्ही जरा हातपाय हलवा, अहो अजितदादा तुम्ही कोणाला हातपाय हलवायला सांगताय? अन्नदात्याला? आपत्ती आल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा हात कपाळावर हाणून घ्यायला लागतोय, त्या शेतकऱ्याला तुम्ही सांगताय हातपाय हालव, मग तुम्ही काय हलवत आहात?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकरी हाताश आहे. अडलेल्या शेतकऱ्यांना आता संकटातून काढलं नाही तर तो परत उभा राहणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. Uddhav Thackeray Slam Ajit Pawar

सरकारला इशारा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जोपर्यंत शेतकरी म्हणून एकवटत नाही, तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी, जर मातीला कोंब फोडता, तर तुम्ही सरकारच्या अन्यायाविरोधात पाझर फोडू शकत नाही का?” अशी विचारणा शेतकऱ्यांना केली. तसेच जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











