India Vs Pakistan Asia Cup 2025 final match – भारताचा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना म्हटलं की दोन्ही देशाचे एक प्रकारचे धर्म युद्ध असते. आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. यानंतर सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान खडे चारले आहेत. यानंतर पाकिस्तानने बांग्लादेशला हरवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळं आज दोन्ही देशामधील हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भिडणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रीडाप्रेमीचे लक्ष लागले आहे. हा सामना कुठे आणि किती वाजता पाहयला मिळणार आहे.
मॅच कोणत्या चॅनेलवर लाईव्ह दिसणार?
- सोनी स्पोर्ट्स 1
- सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी)
- सोनी स्पोर्ट्स 4
- सोनी स्पोर्ट्स 5
मॅच कुठे आणि किती वाजता होणार?
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ही मॅच दुबईमध्ये सांयकाळी 6.30 वाजता सुरू होईल. ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. मात्र नाणेफेक सांयकाळी 7.30 वाजता होईल. यानंतर आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन टेलिकास्ट?
भारत-पाकिस्तान मॅचचे ऑनलाइन स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप किंवा वेबसाईटवर पाहता येईल. सोनी लिव्ह अॅप व्यतिरिक्त, फॅनकोड अॅप आणि वेबसाईट आशिया कप 2025 मॅचचे थेट प्रक्षेपण देखील करत आहे. सध्या फॅनकोड वेबसाईटवर या मॅचसाठी एन्ट्री फी 189 रुपये आहे.
भारतीय संभाव्य टिम :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानची संभाव्य टिम :
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हसन नवाज, सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, अबरार अहमद, हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.












