आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा पाकिस्तानला आणखी दणका, ट्रॉफीशिवाय साजरा केला आनंदोत्सव

Smita Gangurde

दुबई- टीम इंडियानं पाकिस्तानची धुळदाण उडवत आशिया चषकावर नाव कोरलं. मात्र फायनलपेक्षा त्यानंतर मैदानावर घडलेलं नाट्य अधिक गाजलं. पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आणि मंत्री मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देत भारतानं सर्वांसमक्ष पाकला जागा दाखवली

भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु ते व्यासपीठावरच उभे होते. पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली. पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी स्वीकारलीच नाही. भारताचे खेळाडू प्रेंझेटेशन सेरेमनीदरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले

पुरस्कार सोहळ्यावेळी काय घडलं?

एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघ सज्ज होता. परंतु मोहसीन नक्वी यांनीते होण्यापासून रोखलं. पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी बाजूला उभे राहिले. नक्वी मात्र आपल्या जागेवरून बिलकुल हटले नाहीत. नक्वींनाच भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यायची होती. भारताने नकार दिल्यानंतर नक्वी
ट्रॉफी घेऊन गेले.

भारतीय संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ९ व्यांदा आशिया चषक जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलासह पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देण्याचा निर्णय घेतलाय तर भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे आगळेवेगळे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावलाय

ठाकरेंच्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका

खासदार संजय राऊतांनी टीम इंडियावर निशाणा साधलाय. आशिया चषक सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने मोहसीन नक्वींसोबतफोटो काढले, हस्तांदोलन केलं याचा व्हिडीओ पोस्ट केला. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारत पाकिस्तान सामन्याला विरोध बघायला मिळाला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकरांनी टीमचं अभिनंदन करत पार्टीला देखील उपस्थिती लावली. यावेळी नार्वेकर यांनी जय शहा यांची भेट घेतली

पाकिस्तानला हिसका, जगाला संदेश

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर यामुळं भारतानं पाकिस्तानशी सर्व संबंध तोडलेत. त्यामुळं भारताने पाकिस्तान विरोधात क्रिकेट न खेळता थेट बहिष्कार टाकावा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र तरीही टीम इंडिया खेळली. पाकच्या खेळाडूंशी न बोलणे, त्यांच्याशी हस्तांदोलन टाळणे, अशा छोट्या छोड्या कृतीतून भारतीय संघानं पाकिस्तानला धडा शिकवला. तर अंतिम सामन्यानंतर पाकला हिसका दाखवून भारतानं जगाला संदेश दिलाय

ताज्या बातम्या