लेग स्पिनर अमित मिश्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमित मिश्राने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृ्त्त होत असल्याची घोषणा केली आहे. अमितने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळले. अमितला क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. आज अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांमधून अनेक प्रतिक्रिया खरंतर समोर येत आहेत.
अमित मिश्राचे आंतरराष्ट्रीय करिअर
अमितने देशांतर्गत क्रिकेटपासून ते थेट आयपीएलपर्यंत मजल मारली. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांच्या हजेरीत त्याला जास्त संधी मिळालीच नाही. क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने एकूण 22 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 76 विकेट घेतल्या. अमितला 36 एकदिवसीय सामन्यांत संधी मिळाली. यात त्याने आपल्या फिरकीने 64 खेळाडूंना बाद केले. या व्यतिरिक्त 10 टी 20 सामन्यांतही संधी मिळाली. यात त्याने 16 विकेट्स घेतल्या. अमितने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Team India) एकूण तीन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
Today, after 25 years, I announce my retirement from cricket — a game that has been my first love, my teacher, and my greatest source of joy.
This journey has been filled with countless emotions — moments of pride, hardship, learning, and love. I am deeply grateful to the BCCI,… pic.twitter.com/ouEzjU8cnp
— Amit Mishra (@MishiAmit) September 4, 2025
अमितने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र मोठे योगदान दिले. खेळाडू म्हणून त्याने एकूण 152 प्रथम श्रेणी सामन्यांत 535 विकेट्स घेतल्या. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 252 आणि टी 20 मध्ये 285 विकेट्स आहेत. मिश्राने त्याच्या प्रोफेशनल करिअरमध्ये एकूण 1072 विकेट घेतल्या आहेत. इतकेच नाही तर त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक देखील केले. 4176 धावा त्याच्या नावावर आहेत.
अमित मिश्राच्या निवृत्तीचे कारण काय?
अमित मिश्रा हा भारतीय क्रिकेट संघातील एक यशस्वी फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षे त्याने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. वयाची मर्यादा, तरुण खेळाडूंचा वाढता सहभाग आणि फिटनेसची मागणी ही त्याच्या निवृत्तीची प्रमुख कारणे ठरू शकतात. भारतीय संघात नवनवीन स्पिनरांना संधी दिली जात असल्यामुळे त्याची निवड कमी झाली. आयपीएलमध्येही तरुण खेळाडूंचा दबदबा वाढल्यामुळे त्याची चमक थोडी कमी झाली. दीर्घ कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर सन्मानाने निवृत्ती घेणे हेच योग्य ठरते. त्याचे क्रिकेटमधील योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यामुळे सध्या तरी वाढते वय आणि थकवा हेच मिश्राच्या निवृत्तीचे कारण सांगितले जात आहे.





