साखरपुडा सोहळा फारसा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित होते. तथापि, अर्जुनची होणारी बायको सानिया ही एका मोठ्या कुटुंबातील आहे. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकांचे कुटुंब आहे. घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.
अर्जुनचे क्रिकेट करिअर
अर्जुन तेंडुलकरने 17 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट ए आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. अर्जुनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 33.51 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. तर 23.13 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहे. दुसरीकडे, लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने 25 विकेट घेतल्या आहे. यावेळी त्याची सरासरी ही 31.2 इतकी आहे. तर 17 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 25.07 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या. तसेच 13.22 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग
बॉलिंग अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने १३ धावा केल्या आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने ९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले.