क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात अफेअरच्या चर्चा सातत्याने घडत असतात. त्यामध्ये क्रिकेटर्सचे नाते अनेकदा मनोरंजन विश्वातील महिला अथवा अभिनेत्रींसोबत जोडले जाते. क्रिकेटर मोहम्मद सिराजच्या अशाच एका अफेअरची चर्चा बराच काळ सुरू होती. सिराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याला आशा भोसले यांची नात जनाई भोसले राखी बांधताना दिसत आहे. यानिमित्ताने त्या दोघांना अफेअरच्या चर्चांना ब्रेक दिला आहे.
जनाईने सिराजला राखी बांधली!
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या वर्षीचा रक्षाबंधन सण खास पद्धतीने साजरा केला. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यात कोणताही क्रिकेट कार्यक्रम नसल्याने खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. सिराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याला आशा भोसले यांची नात जनाई भोसले राखी बांधताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
व्हिडिओमध्ये सिराज पांढऱ्या कुर्त्यात असून, जनाई हिरव्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात आहे. जनाईने या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, “हजारमध्ये एक हा क्षण, याहून चांगले काहीच मिळू शकत नाही.” काही काळापूर्वी दोघांच्या नातेसंबंधाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या.यामागचे कारण म्हणजे त्यांचा एकत्र फोटो व्हायरल होणे हे होते आणि जनाईचे आयपीएल सामन्यांदरम्यान सिराजला मैदानावर पाठिंबा देणे. तथापि, या अफवांचे दोघांनीही आधीच खंडन केले आहे. जनाईने सिराजसोबतचा फोटो शेअर करून त्यांना आपला प्रिय भाऊ म्हटले होते, तर सिराजनेही तिच्याबद्दल “बहिणीसारखी गोड कोणी नाही” असे लिहिले होते.
त्यामुळे या निमित्ताने तरी आता दोघांमधील अफेअरच्या चर्चांना ब्रेक लागणार असं दिसत आहे. मोहम्मद सिराज आपल्या प्रभावशाली गोलंदाजीमुळे अवघ्या जगभरात ओळखला जाते. शिवाय जनाई भोसलेची प्रतिमा देखील चांगलीच चर्चेतील आहे.





